
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य
डॉ बाबासाहेब आंबेडकर माणसाला आपल्या दारिद्राची लाज वाटता कामा नये, लाज वाटली तर फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी. महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर या तीन समाजसुधारकांच वारसा लाभला आहे. यातील एक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य असे की दलित लोकाविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी ते लढले.
भारतीय संविधानाचे शिल्पगार
ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. भारतीय संविधान बनवण्यात असलेल्या योगदानामुळे आणि देशाच्या विविध क्षेत्रात असलेल्या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पगार, आधुनिक भारताचे शिल्पगार असेही म्हणतात.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्म
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी माहु येथे झाला. त्यांना भीमराव रामजी आंबेडकर असेही बोलले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ होते. त्यांचे माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले.बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्याने परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम्. ए., पीएच्. डी. या पदव्या मिळवल्या आणि ते बॅरिस्टरही झाले.

बहिष्कृत हित्कारणी सभा
उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या पिळवणूकिने दलित समाज भरडला जात होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य असे कीसमाजाला जागृत करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेबांनी आपल्या सामाज्यासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी 20 जुलै 1924 रोजी ‘बहिष्कृत हित्कारणी सभा’ स्थापन केली. ‘शिकावा चेतवा व संघटीत करा, हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. अस्पृश्य मुलांना शिक्षण देणे, वाचनालये काडणे, रात्रीच्या शाळा भरणे अशा कार्यावर बहिष्कृत हित्कारणी सभेचा भर होता. तसेच बाबासाहेबांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली. त्यातूनच पुढे मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय काढले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य असे की दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1927 च्या सुमारास बाबासाहेबांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड ‘चवदार तले’ येथे सत्याग्रह केला. तसेच अस्पृशांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी नाशिक मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह केला.
गोलमेज परिषद
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यच असे होते की इंग्लंड येथे 1930, 1931 आणि 1932 मध्ये झालेल्या गोलमेज परिषदाना दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहता आले. अस्पृशांना राजकीय हक्क असावेत आणि भारताला स्वतंत्र मिळावे आशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदेत केल्या. नंतर भारताला स्वतंत्र मिळाल्यावर भारतीय घटनेचे शिल्पकार ते झाले.
धर्मांतर
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा हिंदू धर्माच्या चिकटीत राहून हिंदू समाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. पण सुवर्ण लोकांचा दृष्टीकोन बदलाने अशक्य आहे असे वाटल्यावर त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी नाशिक जवळ येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. तसेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लक्षावधी अनुयायी सह बोद्ध धर्माचा स्वीकार केला.
महानिर्वाण
6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले. तेथे भारत सरकारने ‘डॉ आंबेडकर राष्ट्रीय स्मारक ‘ निर्माण केले आहे. 2018 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
Pingback: Mahatma Phuleमहात्मा जोतीराव फुले निबंध 11 April - lekh