Mahatma Gandhi Essay महात्मा गांधी निबंध 2 october

mahatma gandhi essay

Mahatma Gandhi Essay

महात्मा गांधी यांचे ‘’ आपण वर्तमानात काय करतो यावर आपले भविष्य अवलंबून असते.’’ असे प्रेरणादायी विचार कायमच आपल्याला एक नवीन दिशा देतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे इतिहासातील सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एका होते. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शस्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते एक वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी समर्पित केले.

Mahatma Gandhi Essay

mahatma gandhi essay

त्यांनी शांती, एकता आणि स्वावलंबाणाला प्रोसाहन देण्यासाठी असंख्या पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांच्या जीवनाची कहाणी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्ताकात लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील सर्व चुकांची प्रांजळपणे कबुली दिली आहे. महात्मा गांधी हे नुसते सत्यावर बोलत नवते. त्यांनी त्या गोष्टींचा स्वत:च्या जीवनात प्रत्यक्ष त्याचा प्रयोग पण करून पण दाखवला.

Mahatma Gandhi Essay

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 ला पोरबंदर गुजरात येथे झाला. महात्मा गांधी यांनी लंडन येथून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. वकिलीचे शिक्षण पूर्ण केले नंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेत प्रथम असहकार आणि सत्याग्रह या तत्त्वांचा वापर केला. लोक महात्मा गांधी यांना बापुजी असेही म्हणत.

Mahatma Gandhi Essay

महात्मा गांधी यांनी 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची सूत्रे सांभाळली. त्या नंतर गरिबी निर्मुलन, स्त्रियांचे समान हक्क आणि सर्व धर्म समभाव यासाठी पण काम केले. 1920 ची बापुजींची असहकार चळवळ. 1930 ची दांडी यात्रा तसेच 1942 चे चाले जाव आंदोलन अशी आंदोलने पण त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध केली.

सामन्याकडून असामान्याकडे कशी वाटचाल करता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच महात्मा गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धेत कधीच अडकले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेच्या कोणत्याही पदाची हाव त्यांनी कधीच धरली नाही. त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य देशाची सेवा करण्यात घालवले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आईन्स्टाईन यांनी असे म्हटले आहे की –

 ‘’आणखी काही वर्षानंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.’’

महात्मा गांधी यांचे आवडते भजन-

”रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीता राम” 

‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान.”

-DIPAK BANSODE.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *