Mahatma Phule यांचे ज्ञान ही एक शक्ती आहे. असे ठाम मत होते. महात्मा फुले शिक्षणाचे महत्व पटून देण्यासाठी असे म्हणतात.
”विद्येविना मति गेली | मतीविना नीती गेली ||
नितीविना गति गेली | गतीविना वित्त गेले ||
इतके अनर्थ एका अविद्येने केले.”
महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर या तीन समाजसुधारकांच वारसा लाभला आहे. यातील एक म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. लोकांमध्ये ते mahatma phule या नावाने जास्त प्रचलित आहेत.
mahatma phule हे थोर समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी आयुष्भर केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. अस्पृशता व जातीवेवस्था दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्भर प्रयत्न केले. तसेच स्त्रीयांना शिक्षण मिळावे यासाठी पण त्यांनी कार्य केले.

mahatma phule बालपण
mahatma phule यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. ते लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या बालकाला गोविंदरावाणी मोठ्या प्रमाने वाडवले. शाळेत घातले. शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावालोकिक होता. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला.
ज्ञानदान
महात्मा फुले हे एक समाजसुधारक होते. समाजातील अज्ञान, जातीभेद ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा त्यांनी पुणे येथे सुरु केली. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन ज्ञानदानाचे काम त्यांनी त्यांच्यावर सोपवले.
चळवळी
हिंदुच्या उच्च जातींमधून विधवा स्त्रियाविरुद्ध होणारा अन्याय दूर करण्यासठी त्यांनी काम केले. त्याकाळी विधवांचा पुनर्विवाह केला जात नव्हता. तसेच विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात होती. तसेच विधवांच्या केशवपनाची अमानुष प्रथा चालू होती. या प्रथा बंध होण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली.
बालहत्या प्रतिबंधक गृहची स्थापना केली. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी भरण्याची बंदी होती. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी त्यांच्या घराचा पाण्याचा हैद खुला केला. स्त्रीयासाठी, तळागाळातील लोकांसाठी त्यांनी बहुमोल कार्य केले.
सत्यासोधक समाज
समाजातील विषमता दूर व्हावी व तळागाळातील लोकापर्यंत शिक्षण पोचावे म्हणून त्यांनी सत्यासोधक समाजाची स्थापना केली. सर्व धर्मांचे नागरिक याचे सदस्य व्हावेत असे महात्मा फुलेना वाटत होते. दीनबंधू प्रकाशनामुळे ही चळवळ समाजातल्या तळागाळा पर्यंत पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यासोधक चळवळीला पाठींबा दिला होता.
लेखन
जोतीराव फुले यांनी अनेक विचारपूर्वक पुस्तके लिहिली. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मनाला जातो. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक हे महात्मा फुले यांचे लिहिलेले शेवटचे पुस्तक आहे. समाजातील शेतकरी आणि श्रमिकांच्या आर्थिक स्थितीचा त्यांनी बारकाव्याने आभ्यास केला. त्याचेच उत्कृष्ट चित्र त्यांनी त्यांच्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकात लिहिले आहे.
जोतीरावानी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला. म्हणूनच लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली.
-Dipak Bansode.
Pingback: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 14 April - lekh